शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !

By admin | Updated: April 18, 2016 03:20 IST

राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला.

सातारा : राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला. रविवारची सुटी असतानाही ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने मंडल अधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाडून सगळे प्रशासन ‘ड्युटी’वर हजर असलेले पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र प्रशासनाची ही ‘कार्यतत्परता’ लोकप्रतिनिधींनारुचली नाही.‘सत्यमेव जयते’ व ‘पानी फाउंडेशन’च्या राज्यातील सातारा, अमरावती अन् बीड या तीन जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांत लोकसहभाग वाढावा म्हणून ‘वॉटर कप’ स्पर्धाही घेण्यात येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) ४० गावांतील ग्रामस्थ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत ५० लाख (प्रथम), ३० लाख (द्वितीय) व १० लाख (तृतीय) अशी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनमध्ये ‘वॉटर कप’ या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तिथेही अशीच तत्परता दाखवावीरविवारी सुटी असतानाही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आमीर खान यांच्या बैठकीत ज्या उत्साहाने प्रशासन हजर झाले होते, तीच तत्परता दुष्काळी भागातील टँकर अन् छावण्यांसाठी दाखविली असती तर सध्याची भीषणता थोडीफार तरी कमी झाली असती, अशा भाषेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या स्पर्धेत श्रमदानातून केल्या जाणाऱ्या जलसंधारण कामाला अधिक महत्त्व आहे. काम कशा पद्धतीने करायचे, यासाठी प्रत्येक गावातील पाच ग्रामस्थांना प्रशिक्षणही देण्यात आले. कोणत्याही कामात नियोजन केले तर ते यशस्वी होतेच, त्यासाठी एकजूट हवी. मी काही मोजकेच चित्रपट करतो; पण जे करतो ते मनापासून आणि परफेक्ट करतो, तसे तुम्हीही हे काम परफेक्ट करा.- आमीर खान, अभिनेता