शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

By admin | Updated: June 3, 2017 03:45 IST

शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विदर्भात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळ, अमरावती,

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विदर्भात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात नेर, महागाव, उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतले. अनेक ठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. नेरमध्ये युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा तहसीलवर धडकला. मोर्चातील २१ शेतकऱ्यांविरुद्ध दुधाचा टँकर अडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. नेरमध्येच रस्त्यावर कलिंगड फेकून शेतकऱ्यांनी सरकारविरोधी धोरणाचा निषेध केला.उमरखेड शहरासह हिवरा येथे शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत रोष प्रकट केला. महागाव येथे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध केला. यवतमाळच्या भाजीबाजारात आवक घटल्याने शुक्रवारी सकाळी शुकशुकाट दिसत होता. वर्धा जिल्ह्यात तळेगाव येथे नागपूर- अमरावती मार्गावर शेतकऱ्यांनी भेंडी रस्त्यावर फेकून आंदोलन केले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अमरावती जिल्ह्यात अचलपूर येथे अमरावती - इंदूर महामार्गावर चांदूर बाजार नाका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून निषेध नोंदविण्यात आला. तेलंगण सीमेवर उद्या आंदोलनशेतकरी संघटनेतर्फे महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवरील लक्कडकोट येथे ४ जून रोजी दूध आणि पालेभाज्यांची आवक रोखण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकार आंदोलन दडपण्याची भूमिका घेत आहे. परंतु आता ते शक्य नाही. शेतकरी संघटना विविध शेतकरी समन्वय समितीची सदस्य आहे. यापूर्वी आम्ही दूध-भात आंदोलन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.