टाऊनशिप उभारणार : ४०० एकर जागा देण्याचे निर्देशनागपूर : मिहान प्रकल्पात दुबई येथील स्मार्ट सिटी या कंपनीला आदर्श गृहनिर्माण वसाहतीसाठी ४०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे झालेल्या बैठकीत मिहानच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे कंपनीतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या आदर्श गृहनिर्माण वसाहतीविषयी माहिती दिली. या कंपनीस मिहानमध्ये आदर्श वसाहत निर्माण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यासाठी ४०० एकर जागा मिळावी, अशी पालकमंत्र्यांना विनंती केली.१५ उद्योगांकडून जागा परत घेणारजिल्हाधिकारी आणि मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, मिहानचे मुख्य अभियंता एस.व्ही. चहांदे यांनी मिहानमध्ये असलेल्या जागांची माहिती दिली. ज्या कंपन्यांनी मिहानमध्ये जागा घेऊन कुठल्याही प्रकारचे उद्योग उभारले नाहीत, अशा उद्योगांकडून जागा परत घेऊन त्या नवीन उद्योजकांना देण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंदाजे १५ उद्योगांकडून जागा परत घेण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. सध्या मिहानमध्ये विकास कामे जोरात सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी देश-विदेशातील नामांकित कंपन्या मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे विदर्भातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती माजी आमदार सागर मेघे व आमदार समीर मेघे यांनी पालकमंत्र्यांना दिली. बैठकीत आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, नागपूर ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके उपस्थित होते. ‘इंदमार’चा एमआरओ लवकरचमुंबई येथे मुख्यालय असलेली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची एमआरओ कंपनी इंदमार एव्हिएशन सर्व्हिस कंपनी मिहानमध्ये दुरुस्ती व देखभाल केेंद्र (एमआरओ) उभारणार आहे. केंद्र उभारणीसाठी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी चार दिवसांआधी जागेची पाहणी केली असून, बोर्इंगलगत साडेतीन एकर जागा देण्यास एमएडीसीने तत्त्वत: मान्यता दिली आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने एमआरओचा विकास करणार आहे. कंपनीने ६० एकर जागेची मागणी केली आहे. इंदमारच्या एमआरओमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
दुबईची ‘स्मार्ट सिटी’ मिहानमध्ये
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST