शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘डीटीई’चा दिलासा

By admin | Updated: June 16, 2014 01:06 IST

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेल की नाही

३ महिन्यांची मुदत : जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र सादर करण्याची तात्पुरती सूटनागपूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेल की नाही असा प्रश्न आहे. परंतु ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) यासंदर्भात पुढाकार घेत अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणीच्या वेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्यात आली आहे. विद्यार्थी त्याऐवजी हमीपत्र सादर करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.‘डीटीई’चे संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी यासंदर्भात अधिसूचनाच जारी केली आहे. २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील, असे सांगण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयारच झाले नसल्याने आता काय करायचे, अशी विचारणा होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन अधिसूचनेनुसार संबंधित अभ्यासक्रमाच्या केंद्राभूत प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश फेरीमार्फत प्रवेश झाल्यानंतर ३ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. जर विद्यार्थी या वेळेत प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत तर त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीबीएम या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्यांनाही ही अट लागू राहील. (प्रतिनिधी)