शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 22:23 IST

मित्रांसमवेत पोहायला गेलेला सुमित संजय कुलकर्णी (१५, रा. माळी गल्ली, पाटोदा) हा रविवारी सकाळी ११ वाजता एका विहिरीत बुडाला.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 7-  मित्रांसमवेत पोहायला गेलेला सुमित संजय कुलकर्णी (१५, रा. माळी गल्ली, पाटोदा) हा रविवारी सकाळी ११ वाजता एका विहिरीत बुडाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.सुमित पाटोद्यातील भामेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रविवारी सकाळी ११ वाजता चार मित्रांसोबत तो घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दहा ते बारा शेतकऱ्यांच्या सार्वजनिक विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. इतर मित्रांनी विहिरीत उड्या टाकल्यानंतर त्यालाही मोह आवरता आला नाही. त्याने देखील धाडस केले; मात्र उडी टाकल्यानंतर पाण्यातून बाहेर आलाच नाही.तो बुडाल्याचे लक्षात आल्यावर चारही मित्रांनी विहिरीबाहेर येत आरडाओरड करून गावात खबर दिली. त्यानंतर महिला-पुरुष विहिरीकडे धावले. विहीर पन्नास फूट खोल असून, जवळून मांजरा नदी गेल्याने त्यात भरपूर पाणी आहे. मृतदेह तळाशी गेल्याने गाळात रुतला असण्याची शंका व्यक्त होत आहे. अद्यापही त्याचा शोध लागत नसल्याने नातेवाईक, ग्रामस्थ विहिरीजवळ तळ ठोकून आहेत. सात विद्युत पंपांद्वारे उपसासात विद्युत पंपांद्वारे विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू आहे. उपसलेले पाणी नदीत सोडण्यात आले आहे; मात्र पाण्याचा प्रवाह कमी होत नसल्यामुळे त्याच्या शोधकार्यात अडथळा येत आहे. घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी भेट दिली. जमादार जालिंदर शेळके हे प्रयत्नशील आहेत. सुमित कुलकर्णी हा अभ्यासात हुशार होता. सकाळी जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आई पंचमीच्या स्वयंपाकात व्यस्त असतानाच तो बुडाल्याची बातमी आली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. त्याचा मृतदेह आढळून येत नसल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. पंचमीच्या सणावर दु:खाचे सावट पसरले आहे.