शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीव जात असतानाही औषधांची वानवा!

By admin | Updated: June 16, 2014 01:03 IST

रुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका

पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू : मनोरुग्णालयात अनास्थेचा मेंटल ब्लॉक सुमेध वाघमारे - नागपूररुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला आवश्यक औषधे मनोरुग्णालयाने उपलब्ध करून न दिल्याने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मेडिकलने कॅन्सरपीडित मनोरुग्ण बिन्ना यांना केमोथेरपी देऊन सुटी दिली. ही थेरपी मेडिकलने स्वत:कडून दिली, उर्वरित चार-पाच थेरपीचा खर्च मनोरुग्णालयाला उचलायचा आहे. रुग्णालय हा खर्च करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रविवारी पहाटे मृत्यू झालेल्या मनोरुग्णाचे नाव दाजी मुक्का (८०) आहे. १९६० मध्ये पोलिसांनी त्यांना रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांचे वय २२ ते २५ च्या दरम्यान असेल. तेव्हापासून ते रुग्णालयाच्या चार भिंतीत बंदिस्त आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांना निमोनिया झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे मुक्का यांना मेडिकलमध्ये भरती केले. चार दिवसांपासून ते मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. रविवार पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुक्का अतिदक्षता विभागात उपचार घेत असतानाही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. विशेषत: डॉक्टरांनी काही अ‍ॅण्टीबॉयटीक बाहेरून विकत घेण्यास सांगितले होते. परंतु कुणाचेच याकडे लक्ष नव्हते. रुग्ण कल्याण समितीचा उपयोगच नाहीरुग्णांवरील औषधोपचार किंवा एखाद्या खासगी चाचणीच्या खर्चासाठी मनोरुग्णालयांमध्ये रुग्ण कल्याण समिती आहे. तीन महिन्यातून एकदा होणाऱ्या समितीच्या बैठकीत झालेला किंवा होणारा खर्च मंजूर केला जातो. परंतु मागील वर्षभरात समितीची बैठकच झालेली नाही. याशिवाय पब्लिक लेजर अकाऊंटमधूनही (पीएलए) पैसे उपलब्ध करून देणे शक्य आहे. याला फक्त आरोग्य विभागाच्या संचालकाची मंजुरी हवी असते. परंतु लालफितीची मनमानी आणि अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे औषधांची वानवा आहे.