शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

औषध खरेदीची होणार चौकशी

By admin | Updated: April 8, 2016 03:28 IST

आरोग्य विभागांतर्गत करण्यात आलेल्या औषधांच्या खरेदीची पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त श्रीमती आय. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल

मुंबई : आरोग्य विभागांतर्गत करण्यात आलेल्या औषधांच्या खरेदीची पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त श्रीमती आय. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. आरोग्य विभागातील बेबंद खरेदीबाबत ‘लोकमत’ने बुधवार व गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी या विषयावर गुरुवारी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. २०१३ साली हृदयरोग्यांसाठी लागणारे स्टेस्टोकॉयमा पॅरासिटीमॉलच्या औषधांचा बदललेला रंग तसेच भंडारा जिल्ह्यातील औषधखरेदीची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांनी ऐन्टीडी नावाच्या इंजेक्शनच्या ४८०० व्हॉयल मागवल्या. प्रत्यक्षात ३१०६ इंजेक्शन्स पडून राहिले आणि एक्सपायरी डेट उलटून गेल्याने वाया गेले. हाच प्रकार यवतमाळ (११७३), वर्धा (३८२) येथे घडला व हजारो इंजेक्शन्स वाया गेली. याकडे सदस्यांनी मंत्र्यांने लक्ष वेधले. त्यावर मंत्री सावंत म्हणाले, जिल्हावार औषध खरेदीची मागणी घेवून प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ४० सदस्यांची समिती खरेदीचा निर्णय घेते. औषध खरेदीच्या पारदर्शक चौकशीसाठी एनएचआरएम आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)> ३०० डॉक्टरांचा सुगावा नाही!आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या ४८५ डॉक्टरांपैकी कायम रजेवर असणाऱ्या १५५ डॉक्टरांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर, उर्वरित ३०० डॉक्टरांचा अद्याप कोणताच सुगावा लागला नसल्याची धक्कादायक माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली. येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील राजीव गांधी जीवनदायी योजनेतील निकषात बदल करण्यात येतील. पांढरे रेशन कार्डधारक आणि पत्रकारांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढविण्याबरोबर उपचाराचीही मर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.