शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागात तीव्र दुष्काळी स्थिती

By admin | Updated: April 29, 2016 01:44 IST

वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी या भागातील जनतेबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांनाही तीव्र दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत

वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी या भागातील जनतेबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांनाही तीव्र दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत असल्याने घोटभर पाणी मिळवण्यासाठी या प्राण्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. यासाठी शासनस्तरावरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. मात्र पाळीव जनावरांबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत हे प्राणी पाण्याच्या शोधात सैरावैरा भटकंती करतात. पिण्यासाठी पाणी शोधत असताना अनेक वेळा या प्राण्यांना मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. या वेळी वनविभागाच्या हद्दीतून जात असताना अनेक वेळा महामार्ग ओलांडावा लागतो. तसेच मोकाट कुत्र्यांच्या व शिकारी करणाऱ्यांच्या तावडीतून सुटणे मुश्कील होते. अशा वेळी अनेक वेळा या प्राण्यांना आपला जीव वाचवणे कठीण झाले आहे. तर पशुपक्ष्यांनाही पाणी उपलब्ध नसल्याने सार्वजनिक नळकोंडाळी अथवा मानवी वस्तीचा सहारा घ्यावा लागत आहे.>वासुंदे परिसरात नुकतेच एक हरिण पाण्याच्या शोधात भटकंती करताना घायाळ झाले होते. हिंगणीगाडा परिसरामध्येही पाण्यासाठी भटकंती करताना दोन चिंकारांना विजेच्या धक्क्याने जीव गमवावा लागला. दिवसेंदिवस तालुक्याच्या जिरायत भागातील ऊन्हाचा पारा वाढतच असून सर्वच सजीव जातीला घोटभर पाण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन भटकंती करावी लागत आहे.>दौंड परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, थेंबभर पाण्यासाठी रस्ता ओलांडताना हरिण व नळकोंडाळ्याचा आधार घेताना कावळा.