शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दुष्काळाचे राजकारण!

By admin | Updated: December 10, 2014 01:35 IST

चिडलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करीत दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले.

अधिवेशनाचा दुसरा दिवस घालवला वाया
अतुल कुलकर्णी - नागपूर
सत्ताधारी बाकावर जाऊनही विरोधकांसारखी भाषा वापरत सत्ताधा:यांनी दुष्काळाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आणि त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करीत दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. मात्र या सगळ्यात दुष्काळाने पिचलेल्या शेतक:यांना दिलासा देण्याचे काम अधिवेशनाच्या दुस:या दिवशी ना सत्ताधा:यांनी केले ना विरोधकांनी! त्यामुळे अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाडा, विदर्भातील शेतक:यांच्या पदरी मात्र निराशाच आली.
मंगळवार हा सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाचा दिवस. त्यामुळे 293 अन्वये राज्यातील दुष्काळावर सरकारने चर्चा मागितली. त्यावरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधक वेलमध्ये उतरले, ठाण मांडून बसले. छगन भूजबळ यांनी दालनात चर्चा मागत सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली आणि खरे दुखणो बाहेर आले. 
सत्ताधा:यांनी दिलेल्या प्रस्तावात शेवटच्या तीन ओळीत ‘‘शेतक:यांना दिलासा देण्यास गेल्या 15 वर्षाच्या शासनाचा कारभार जबाबदार असणो, त्यामुळे जनतेत निर्माण झालेला असंतोष’’ असा उल्लेख होता. त्यावरच विरोधकांचा आक्षेप होता. सरकार ही अव्याहतपणो चालणारी व्यवस्था आहे. मागच्या सरकारने, किंवा 15 वर्षाच्या कारभारावर ठपका ठेवण्याचे काम लिखीत स्वरुपात सरकार कसे काय करु शकते? असा सवाल अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना विरोधकांनी केला. त्यावरुन बरीच जोरदार चर्चा आत रंगली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री कार्यक्रम पत्रिका तयार झाली. ती संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांना दाखवण्यात आली. त्यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात होते. तेथेच महसूलमंत्री एकनाथ खडसे देखील होते. आता आपण विरोधात नाहीत, सत्तेत आहोत, तेव्हा प्रस्तावाची भाषा बदला. सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी जे काही काम केले आहे ते आधी लिहा आणि तरीही हे कमी आहे म्हणून काय काय करायला हवे ते लिहून, तशी वाक्यरचना करुन प्रस्ताव टाका असे सांगण्यात आले. मात्र दुरुस्ती झाली नाही आणि मागच्या सरकारवर विद्यमान सरकारने लेखी ठपका ठेवल्याचे दिसताच विरोधक संतापले. मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावाचा मसुदा शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने तयार केला होता. त्यावर वरीष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत आता आपण सत्तेत आहोत, विरोधात नाही, असे बोल ज्येष्ठ मंत्र्यांनी सुनावत नाराजीही व्यक्त केल्याचे सुत्रंनी सांगितले.
यावर उपाय म्हणून खडसे यांनी दोन तास काय, दोन दिवस आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत असे जाहीरपणो सभागृहात सांगितले पण विरोधकांना ते पटले नाही. हे कारण कसे सांगायचे म्हणून मग आधी पॅकेज जाहीर करा, चर्चा नको, घोषणा द्या, अशी भूमिका विरोधकांनी मांडली. त्यावर चर्चा न करताच पॅकेज कसे काय द्यायचे असा सवाल बंद दाराआड झालेल्या चर्चेत उपस्थित झाला. शेवटी कोणीच मागे हटायला तयार नसल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद झाले.
 
राज्यपालांच्या भाषणावरील चर्चा पुढे ढकलून सत्ताधारी पक्षाने आणलेल्या 293 वर चर्चा करण्यास आपण तयार होतो पण विरोधकांना चर्चा नको होती, त्यांना त्यात राजकारण आणायचे होते म्हणून आजचा दिवस वाया गेला अशी प्रतिक्रीया नंतर लोकमतशी बोलताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.