शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा यांचा दुष्काळ‘सेल्फी’

By admin | Updated: April 19, 2016 14:02 IST

येथील मांजरा नदीच्या खोलीकरणाला भेट दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी काढलेला सेल्फी आणि केलेले फोटोसेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

लातूर : येथील मांजरा नदीच्या खोलीकरणाला भेट दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी काढलेला सेल्फी आणि केलेले फोटोसेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनीच टिष्ट्वटरवर टिष्ट्वट केलेल्या ‘सेल्फी’वर नेटिझन्स्नी टीकेची झोड उठविली. यानंतर दिवसभर वृत्तवाहिन्यांवर चाललेल्या या सेल्फीच्या रामायणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्तिश: मुंडे यांच्यासोबत राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. लातूरच्या मांजरा नदीवर लातूरकरांनी स्वत: जमविलेल्या निधीतून साई आणि नागझरी बंधाऱ्याच्या १८ किमी खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी या कामाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड यांचीही उपस्थिती होती. नदीच्या खोलीकरणाचे काम पाहून भारावलेल्या पंकजा यांनी नदीच्या पात्रात उतरून आपल्या मोबाइलमधून फोटोसेशन केले. इतकेच नव्हेतर, खोदलेल्या नदीसमोर उभे राहून सेल्फीही काढले. यातीलच एक सेल्फी त्यांनी टिष्ट्वट करून ‘सेल्फी वुईथ ट्रेंच आॅफ साईड बॅरेज मांजरा.. वन रिलिफ टू लातूर’ असा मजकूरही पोस्ट केला. परंतु ही पोस्ट पडताच टिष्ट्वटरवरून नेटिझन्स्नी एकच हल्लाबोल केला. ‘आता मदत द्यायचे सोडून सेल्फी काढा’, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसोबत सेल्फी काढा’ ‘मंत्र्यांनी उपाय सुचवावेत, सेल्फी काय काढता’ अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाहीनवी दिल्ली: मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत असताना महाराष्ट्राचे मंत्री दुष्काळी पर्यटनासाठी आल्यासारखे स्वत:चे ‘सेल्फी’ काढतात यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, हेच स्पष्ट होते, अशी खरमरीत टीका काँग्रेसने सोमवारी केली.काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, लोकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी मंत्र्यांनी स्वत:चे ‘प्रमोशन’ करायचे हाच फडणवीस सरकारचा अग्रक्रम असल्याचे पंकजा मुंडे यांच्या वागण्यावरून दिसते. चतुर्वेदी म्हणाल्या की, सेल्फी पर्यटन हे मराठवाड्याच्या समस्यांवर उत्तर नाही. सेल्फी/ दुष्काळी पर्यटनाने सर्व प्रश्न सुटू शकतात, असे राज्य सरकारला वाटते की काय? -----------------------------सेल्फीचे राजकारण नको : भाजपाभारतीय जनता पक्षाने मात्र सेल्फी प्रकरणामुळे अडचणीत आला असून, झाल्या प्रकाराचे कोणी राजकारण करू नये, अशी भूमिका त्या पक्षाने घेतली आहे. महाराष्ट्र सरकार राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लातूरमध्ये रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याकडे दुर्लक्ष करून, सेल्फीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि राज्य सरकारवर टीका करणे योग्य नाही, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. मात्र हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. (प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क)