शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा मुद्दा विधिमंडळात उचलणार!

By admin | Updated: March 5, 2016 02:55 IST

विखे पाटील यांचा अकोला, वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा.

अकोला: दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, यासाठी सरकारकडे कोणतेच धोरण नसल्याची टीका करीत विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळासह रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात सरकारला जाब विचारण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला. विखे पाटील यांनी शुक्रवारी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळात शेतकरी, जनता होरपळत असताना, जनतेच्या मागे विश्‍वासाने उभे राहणे गरजेचे आहे; मात्र मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हय़ाधिकार्‍यांकडून आढावा घेऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचे टीकास्त्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर डागले. पिके हातची गेली, उत्पन्न नाही, हातात पैसा नाही, कर्जापायी कंटाळलेले शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपाचे खासदार त्यांचा उपहास करतात, टिंगल उडवतात. मराठवाड्यातील गावंच्या गावं (पान १ वरुन) अन्नाच्या शोधासाठी स्थलातंरित होत आहेत. अशावेळी शेतकर्‍यांचा उपहास, टिंगल करणार्‍या भाजप खासदारांची बौद्धिक दिवाळखोरी समोर येत आहे. दुष्काळी भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी अकोला जिल्ह्याच्या दौर्‍याप्रसंगी केला. अकोला जिल्ह्यातील किनखेड, गांधीग्राम आणि बाभूळगाव आदी गावांना भेट देऊन त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. वाशिम जिल्ह्यातील मेडशीनजिकची आदिवासी गावं कोळदरा आणि वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेडशी येथे त्यांनी दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईबाबत शेतकर्‍यांशी संवाद साधला. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत आणि सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. हे सरकार शेतकर्‍यांचे नसून उद्योगपतींचे आहे. शेतकर्‍यांचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची हजारो कोटी रूपयांची कर्ज माफ केली जातात, असा आरोप त्यांनी केला.चारा छावण्या बंद; लावण्या सुरूराज्यात, मराठवाड्यात पाणी, चार्‍यावाचून गुरे दगावत असताना, राज्य शासनाने चारा छावण्या बंद केल्या असून, लावण्या सुरू केल्या (डान्स बार) आहेत. डान्स बार बंद करण्यास कायद्यात काय बदल करायचे ते करावेत, यासाठी काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, पण सरकारने या बाबतीत मौन धारण केले असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.