शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनावर दुष्काळी ढग

By admin | Updated: March 9, 2016 06:23 IST

बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मागील अधिवेशनात प्रलंबित असणारी काही विधेयके पुन्हा मांडण्याचे व नवीन काही विधेयके मंजूर करून

मुंबई : बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मागील अधिवेशनात प्रलंबित असणारी काही विधेयके पुन्हा मांडण्याचे व नवीन काही विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोरदार नियोजन केले असले तरी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी हे अधिवेशन वादळी होणार, याचे संकेत दिले. राज्यातील १४ जिल्ह्यांत भीषण दुष्काळ असून, चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय, डान्सबार बंदी रोखण्यात सरकारला आलेले अपयश, पोलिसांवर होणारे हल्ले, बंद करण्यात आलेल्या चारा छावण्या, अत्यल्प खर्च झालेले बजेट आणि काही मंत्र्यांची बाहेर आलेली ‘प्रकरणे’ यावरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजवर लक्ष्य बनविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैनगंगा प्रकल्पावरून कोंडी करण्याची व्युहरचना आखण्यात आली आहे. या प्रकल्पास सुधारित मान्यता देताना अव्वाच्या सव्वा किंमत वाढविण्यात आली आहे.कागदोपत्री हे अधिवेशन ४० दिवसांचे असले तरी यात १७ दिवस सुट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, सरकार अर्थसंकल्प मंजूर झाला की, अधिवेशन गुंडाळण्याच्या मानसिकतेत आहे. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे हैराण आहेत तर काँग्रेसमध्ये आक्रमकपणे बोलणाऱ्या नेत्यांचा अभाव आहे. दुसरीकडे शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी त्यांचे आमदार संधी मिळेल तेथे विरोधकांच्या भूमिकेत जाण्याची तयारी करुन बसले आहेत.आम्ही दुष्काळी पर्यटन केलं असा आरोप करणाऱ्या विरोधकांनी किमान नवीन काही शब्द तरी वापरायला हवे होते. विरोधी पक्षांचा आमचा अनुभव जादा आहे; कमी पडत असतील तर आमच्याकडून शब्द घ्या. कोणत्याही विषयावर चर्चेची आमची तयारी आहे.-देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीअधिवेशनाच्या तोंडावर घाईघाईने मंत्रिमंडळाने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याचा दौरा केला. जानेवारी २०१६पासून आतापर्यंत तब्बल २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित होत असताना मुख्यमंत्री मात्र जुन्याच घोषणांची उजळणी करीत आहेत. मंत्र्यांच्या दुष्काळी पर्यटनाने जनतेच्या हाती काहीच लागले नाही.- राधाकृष्ण विखे, विरोधीपक्ष नेते