शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

देशात व्याघ्र संवर्धनासाठी ‘ड्रोन’ कॅमेरे

By admin | Updated: August 2, 2016 05:24 IST

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारी शिकार तसेच व्याघ्रमृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

गणेश वासनिक,

अमरावती- देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारी शिकार तसेच व्याघ्रमृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. लष्कराच्या धर्तीवर देशात ४९ व्याघ्र संवर्धनात हे कॅमेरे असतील.मागील पाच ते सात वर्षांपासून वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुद्धा ही बाब तपासाअंती सिद्ध केली आहे. त्यामुळे व्याघ्रांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ‘एनटीसीए’ने ठरविले आहे. ‘टायगर प्रोटेक्शन फोर्स’, महिला विंग, अद्ययावत सुसज्ज वाहने, सैन्याप्रमाणे व्याघ्र संवर्धन सीमांवर सशस्त्र पहारेकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. मात्र, व्याघ्र संवर्धनाच्या सीमा या दुर्गम, अतिदुर्गम, दरीखोरे, डोंगर पायथ्यालगत असल्याने अशा परिसरात वनकर्मचाऱ्यांना पोहोचणे अशक्य असते. त्यामुळे व्याघ्र संरक्षणासाठी ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. फोटोग्राफीद्वारे क्षणात वाघांचा संचार, वास्तव तसेच तस्करीवर बारकाईने नजर ठेवणे शक्य होणार आहे.>कान्हा राष्ट्रीय उद्यानात चाचणी वाघांच्या संवर्धनासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणे शक्य आहे अथवा नाही, याची चाचणी नुकतीच मध्य प्रदेशच्या कान्हा राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली अ. मंडला व बालाघाट या जिल्ह्यामध्ये विस्तार असलेल्या कान्हा राष्ट्रीय उद्यानातील वाघांचे अस्तित्व ‘ड्रोन’ कॅमेऱ्यात टिपता आले आहे.‘ड्रोन’ कॅमेऱ्यांमुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाघांच्या हालचाली सहजतेने टिपता येतील. ‘एनटीसीए’ने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. तरीदेखील लवकरच व्याघ्र संवर्धनात हे कॅमेरे कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे.- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प