शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने एस. टी. बस पुराच्या पाण्यात घातली अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 21:39 IST

खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर येथे नारंगीनदीच्या पुराचे पाणी भरल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे

ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 18  - खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर येथे नारंगीनदीच्या पुराचे पाणी भरल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. लहान वाहने पर्यायी मार्गाने जात होती तर मोठी वाहने रस्त्यात रांगेत उभी  होती मात्र दापोलीहून खेडकडे येणाऱ्या एका एस. टी. चालकाने अतिउत्साह दाखवत रस्त्यावरून  पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत असताना त्या पुराच्या पाण्यात एस.ती.बस घातली आणि मधोमध जाताच एस. टी. बस बंद पडली. सुदैवाने त्या बसमध्ये काही मोजकेच प्रवासी होते. ते छातीइतक्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडले. पुराच्या पाण्यात मधोमध बंद पडलेली बस तेथे जमलेल्या काही धाडसी तरुणांनी धक्के मारून बाहेर काढली.

खेड शहरात पूरस्थिती
शहरात मंगळवारी दिवसभर पूरपरिस्थिती कायम राहिली. मंगळवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी व नारिंगी नद्यांना पूर आला. या दोन्ही नद्यांनी आपली पातळी ओलांडली. जगबुडी नदीने ७ मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड पालिकेने व शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व्यापारी व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.
पुराचे पाणी मंगळवारी पहाटेपासून बाजारपेठेत घुसण्यास सुरुवात झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला शहरातील मटण मार्केट व मासळी मार्केट पुराच्या पाण्यात गेले. सुक्या मासळीची ५० दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. या इमारतींमधील इतर साहित्य पाण्यावर तरंगत आहे.
जगबडी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील गांधी चौकातील व्यापारी धास्तावले आहेत. नदीकिनारी वसलेला तांबे मोहल्ला, महाडिक मोहल्ला व साठे मोहल्ल्यामध्ये पुराचे पाणी भरण्याची शक्यता असल्याने खेड पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी शहरात रिक्षाद्वारे सावधानतेचे आवाहन केले आहे.