शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ‘थीमपार्क’चे स्वप्न भंगणार

By admin | Updated: March 21, 2017 03:54 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतरही सत्तेची संधी हुकलेल्या भाजपाने शिवसेनेची कोंडी सुरू केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतरही सत्तेची संधी हुकलेल्या भाजपाने शिवसेनेची कोंडी सुरू केली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला दणका महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बसला आहे.महापालिकेचे सुमारे चार हजार भूखंड भाडेकराराने देण्यात आले आहेत. यातील २३६ भूखंडांचे भाडेकरार २०१३ साली संपले आहेत. तरीही महापालिकेने हे भूखंड अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत. यातील अनेक भूखंडांवर कराराचा भंग करून अनधिकृत बांधकाम झाले आहे. कराराचा भंग करणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सचा ताबा असलेल्या मेसर्स रॉयल वेस्टर्न टर्फ कल्बने कराराचा भंग केला. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र हा प्रस्ताव गेली तीन वर्षे सरकार दरबारी धूळखात आहे.सत्तेवर सरकार आल्यानंतरही युती असताना भाजपा सरकारने कोणतीच पावले उचलली नाही. याउलट आता युती तुटल्यामुळे शिवसेनेचा हा प्रस्ताव बासनात जाण्याची शक्यता आहे. भाजपा सरकारने नियमात बदल करून भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण व नवीन अट घालण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देत पूर्व परवानगी राज्य शासनाची असेल, अशी तरतूद केली आहे. भाजपा सरकारच्या या नव्या अधिसूचनेमुळे महापालिकेला जमिनीच्या भाडेकराराचे नूतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न आता अपुरे राहणार आहे. (प्रतिनिधी)