शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे कंबरडे मोडण्याची भीती

By admin | Updated: July 1, 2016 03:42 IST

शहरात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे.

डोंबिवली : शहरात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काँक्रिटीच्या रस्त्यांवर लावलेले पेव्हर ब्लॉक काही ठिकाणी निखळले आहेत. तर काही ठिकाणी ते खचले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे कंबरडेच मोडण्याची भिती आहे. खड्ड्यांमध्ये रिक्षा, दुचाकींचे टायर अडकत असल्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत.पूर्वेतील मानपाडा, बालभवन, शिवमंदिर, केळकर रोड, चार रस्ता, फडके रोड, शेलार चौक, एमआयडीसी निवासी विभाग आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ््यापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याही खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या कडेला, चौका-चौकांत पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. काँक्रीट व पेव्हर ब्लॉक योग्य पद्धतीने जोडण्यात न आल्याने तेथे पाणी मुरत आहे. परिणामी पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापरले आहेत. तेही अस्ताव्यत होत आहेत. त्यात रिक्षा, दुचाकी, व मोटारींची चाके अडकत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. शिवाय वाहतूक कोंडीत भर पडत आहे. केळकर रोडवरील डबर-दगड पावसाने पुन्हा बाहेर आले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रेती रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यांची काम योग्य पद्धतीने न झाल्याने चौकशी करावी, कंत्राटादाराकडून पुन्हा कामे करून घ्यावीत, दोषी कंत्राटादारांना काळ््या यादीत टाकावे. पालिकेच्या अभियंत्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.