शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या खिशावरच डल्ला

By admin | Updated: December 24, 2015 02:13 IST

एसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटीकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करताना थेट प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा अजब प्रकार महामंडळाकडून केला जाणार आहे.

सुशांत मोरे,  मुंबईएसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटीकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करताना थेट प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा अजब प्रकार महामंडळाकडून केला जाणार आहे. एसटी महामंडळाकडून नवी अपघात सहायता निधी योजना सुरू करण्यात येणार असून, यामुळे एसटी तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ होणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नवीन योजनेवर निर्णय होईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. एसटी महामंडळाच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातांमध्ये मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटी महामंडळाकडूनच नुकसानभरपाई दिली जाते. यात भरपाईची रक्कम कमी वाटत असल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई स्वीकारली जात नाही. तसेच न्यायालयीन दावेही प्रवासी किंवा त्यांच्या वारसांकडून केले जातात. सध्या मृत प्रवाशांच्या वारसांना ३ लाख रुपये, तर जखमी प्रवाशाला ४0 हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. यात बदल करण्याचा निर्णय घेत नवीन अपघात सहायता निधी योजनेनुसार मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर जखमी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे. मात्र ही योजना राबविताना प्रवाशांच्या खिशातूनच त्याची वसुली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही वसुली प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर टक्केवारी आकारून केली जाईल. टक्केवारीनुसार आकारणी करावयाची झाल्यास सर्व प्रवाशांना त्यांनी केलेल्या अंतराच्या प्रमाणातच आकारणी होणार आहे. म्हणजेच कमी अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी अधिभार व जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त अधिभार लागू होईल. यामुळे प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही योजना लागू करण्याचा निर्णय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी बोर्डाच्या बैठकीत होईल.