शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 17, 2015 10:00 IST

निवृत्त जवानांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - पाकिस्तानच्या गोळ्या झेलणा-या भारतीय सैन्यातील निवृत्त जवानांना आता स्वराज्यातील पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 
वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात मोदी सरकार अद्याप अपयशी ठरले असून या प्रश्नावरुन निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ज्यांनी स्वातंत्र राखण्यासाठी बलिदान दिले त्यांना स्वातंत्र्या दिनीच पोलिसांकडून धक्काबुक्की होणे अयोग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  होता. रामेदवबाबा यांच्यावरील पोलिस कारवाईविरोधात मनमोहन सिंग सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करणारे आता सत्तेवर असून आता त्यांचेच दांडे जवानांना सोसावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार, आमदार त्यांचे वेतन भत्ते वाढवून घेतात, सरकारी कर्मचारीही महागाई भत्ता वाढवून घेतात, पण कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी चालढकल केली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारला निवडून आणण्यात माजी जवानांनीही मोलाची भूमिका बजावली होती, निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढू असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता हे आश्वासन तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही त्यांनी केली.