शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

भारतीय आध्यात्म, संस्कृतीला नवे परिमाण देणारे नाटक

By admin | Updated: April 12, 2017 01:51 IST

युगपुरुष- महात्मा के महात्मा’ हे केवळ नाटक नाही तर मोलाचा विचार आहे. या नाटकाने भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : ‘युगपुरुष- महात्मा के महात्मा’ हे केवळ नाटक नाही तर मोलाचा विचार आहे. या नाटकाने भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकातून श्रीमद्जींचे आध्यात्मिक विचार मराठीतून पोहोचविण्याचा श्रीमद् राजचंद्र मिशनचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.राजेश जोशी दिग्दर्शित ‘युगपुरुष : महात्मा के महात्मा’ या नाटकाच्या पहिल्या मराठी प्रयोगाचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या प्रयोगाच्या शुभारंभास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवजी राकेशभाई, अ‍ॅड. जनरल रोहित देव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, जयंत म्हैसकर, अभिनेत्री आदिती गोवित्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्यात आणून अहिंसेच्या मंत्राने इंग्रजांना शह दिला आणि हा अहिंसेचा मंत्र गांधीजींना श्रीमद्जींच्या विचारातून मिळाला. महात्मा गांधींनीसुद्धा आपल्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव श्रीमद्जींचा असल्याचे नमूद केले आहे. ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्याकडील ज्ञान आणि विचार समाजापर्यंत पोहोचवले. भारतीय संस्कृतीनुसार बौद्धिक प्रगतीसह आध्यात्मिक प्रगती होणेही महत्वपूर्ण आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळविताना त्याला आध्यात्मिकतेची जोड मिळणे आवश्यक आहे.यापूर्वी हे नाटक हिंदी, गुजराती, कन्नड या भाषांमध्ये रंगभूमीवर आले असून नाटकाचे १४८ दिवसांत पावणे चारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. आता हे नाटक मराठी भाषेत रंगभूमीवर आले असून मराठीतून २५ प्रयोग होतील. लवकरच इंग्रजी, बंगाली आणि तामिळ भाषेतही त ेरंगभूमीवर येईल. प्रसिद्ध लेखक उत्तम गाडा यांनी या नाटकाचे लेखन केले असून संगीत दिग्दर्शन सचिन-जिगर यांचे आहे. (प्रतिनिधी) जलयुक्त शिवारसाठी ११ लाख - श्रीमद् राजचंद्र मिशन परिवारामार्फत समाजसेवेचे विविध उपक्रम राबविले जात असून मिशनच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानासाठी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. - या नाटकाच्या मराठीतील २५ प्रयोगांतून प्रति प्रयोगामागे २५ हजार रुपये या अभियानासाठी देण्यात येतील. दुष्काळग्रस्त परिस्थितीत मिशनच्या वतीने बीड जिल्ह्यात केलेल्या विविध समाजोपयोगी कायार्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गौरव केला.