शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून भाजपा कार्यकारिणीत नाट्य

By admin | Updated: October 7, 2016 05:31 IST

भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते

मुंबई : भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांनी बैठकीलाच दांडी मारल्याने ऐनवेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हा ठराव मांडावा लागला.भाजपा कार्यसमितीची दोन दिवशीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा ठराव मांडला गेला. मात्र, ठरावाचा मसुदा अत्यंत मोघम ठेवण्यात आला. या ठरावात मराठा समाजास शिक्षण व नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर हे आरक्षण ओबीसींच्या विद्यमान आरक्षणाहून वेगळे असायला हवे व अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणासही त्यामुळे धक्का लागता कामा नये, असे त्यात नमूद केले आहे. शिवाय, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेले बंधनही (कमाल ५० टक्के) पाळले जावे, असे हा ठराव म्हणतो.मराठा आरक्षणाचा ठराव मांडण्यावरूनही बैठकीत राजकीय नाट्य रंगले. हा ठराव मंत्री पंकजा मुंडे मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांनी नेमक्या वेळी बैठकीकडे पाठ फिरवल्याने ऐन वेळी हा ठराव मांडण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली. ओबीसींच्या नेत्या अशी पंकजा यांची ओळख सर्वश्रुत आहे.कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासह राजकीय आणि शेतीविषयक ठराव संमत करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना दिली. राज्यात मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरत असून, मोर्चांची तयारी सुरू आहे. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर काहीसे नाराज झालेल्या दानवे यांनी धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला १५ वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जबाबदार आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते, तर प्रश्न निर्माण झाले नसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीच्या नेत्यांना जाग आली. भाजपा मात्र, मराठा आरक्षणाला कटिबद्ध आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल, असे दानवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)