शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

देहूगावात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

By admin | Updated: July 4, 2016 02:04 IST

दोन दिवस पडत असलेल्या सतत पावसामुळे गावात ठिकठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते.

देहूगाव : दोन दिवस पडत असलेल्या सतत पावसामुळे गावात ठिकठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते. रस्त्यावरील सखल भागात पाण्याची तळी साचली असून, प्रवेशद्वार कमानीखाली मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते.देहू-देहूरोड रस्त्याच्या कडेला नुकतेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पालखी प्रस्थानाच्या तोंडावर रस्त्याचे काम करताना खड्डे व चर पडले होते. चर बुजविण्यात आले. मात्र, पुरेसा भराव न टाकल्याने या चरामध्ये एक मालट्रक रुतून बसला होता. त्यामुळे देहू-देहूरोड मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा होत होता. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्यम स्वरूपाचा, परंतु संततधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला असून, पावसाने उघडीप दिल्यास दोन-तीन दिवसांत सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात होऊ शकते. देहूगाव परिसरात अद्यापपर्यंत मोठा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतीची नांगरणी करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय होती, त्यांनी भाजीपाला पिकविला होता. दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू झाल्याने शेतामध्ये सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे. गावठाणामध्ये गटारे पावसाच्या पाण्याने तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. गावात नुकतीच रस्त्याची कामे झाली आहेत. गाथा मंदिर रस्ता, वडाचा माळ परिसरात डे्रनेज जोडली नसल्याने ती ठिकठिकाणी तुंबली होती. त्याच्या चेंबरमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते. (वार्ताहर)