शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या किनारपट्टीवर प्लास्टिकला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 03:50 IST

डहाणू तालुक्याचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक पिशव्यांनी व्यापला असून जिकडे तिकडे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्याचे विद्रुपीकरण झाले

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्याचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक पिशव्यांनी व्यापला असून जिकडे तिकडे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्याचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे विकेंडला समुद्री पर्यटनासाठी आलेल्या परगावातील पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या अवकळेमुळे स्थानिक मच्छीमार, पर्यावरणप्रेमी आणि व्यायामाला येणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. रुपेरी वाळू, कांदळवन आणि किनाऱ्याला लाभलेली नारळाच्या झाडांची झालर या निसर्गसौंदर्याने समुद्री पर्यटन स्थळांमध्ये डहाणूला विशेष पसंती दिली जाते. बोर्डीसह घोलवड, चिखले, नरपड, आगर आणि पारनाका या चौपट्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. सध्या पावसाळा सुरू असल्याने धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असले तरीही विकेंडला समुद्री पर्यटनाचा ओघ ओसरलेला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे पुरासह प्लास्टीक समुद्रात वाहून गेले आणि मागील आठवड्यापासून भरतीच्या पाण्यासह किनाऱ्यावर कचरा साचण्यास सुुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.व्यायामाकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटू लागल्याचे चिखले गावातील समुद्रकाष्ठ मित्र मंडळाच्या अशोक गावड, लक्ष्मण गावड, उमेश चुरी यांनी सांगितले. प्लास्टिकचा विळखा समुद्रातील तिवरांच्या झाडांना बसून आगामी काळात कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात येण्यासह सागरी जैव विविधतेची हानी होणार आहे. समुद्री कासवांचा हा विणीचा हंगाम असल्याने अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. >किनाऱ्यावर प्लास्टिकचे साम्राज्य पसरल्याने पर्यावरणाची हानी, परिसराचे विदु्रपीकरण तसेच स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे.- उमेश चुरी, चिखले गावातील नागरिक