शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. तात्याराव लहाने यांना नोटीस

By admin | Updated: April 1, 2017 04:17 IST

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांना न्यायालयाची

मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांना न्यायालयाची परवानगी न घेताच खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिल्याने जे. जे रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. डॉ. लहाने यांना चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.डिसेंबर २०१६ मध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी छगन भुजबळांना जे.जे.मध्ये दाखल केले असताना जे.जे. रुग्णालयाने न्यायालयाची परवानगी न घेताच त्यांना परस्पर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वास्तविक भुजबळांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी जे.जे.ने विशेष पीएमएलए न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यामुळे जानेवारी २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने जे.जे.चे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत खंडपीठाने डॉ. लहाने यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.डिसेंबर-जानेवारीमध्ये भुजबळांना काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्याच चाचण्यांबाबत दुसरे मत घेण्यासाठी जे.जे. रुग्णालयाने त्यांची रवानगी बॉम्बे हॉस्पिटलला केली. मात्र त्यापूर्वी न्यायालयाकडून आदेश घेतले नाहीत. न्यायालयापुढे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात यावे, यासाठी जे. जे. रुग्णालय आग्रही होते. (प्रतिनिधी)अन्य आजारांवर उपचार करण्याचे आदेश नव्हतेन्यायालयाच्या आदेशााचे उल्लंघन करण्यात आले आहे. न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला भुजबळांच्या तीन वेगवगेळ्या चाचण्या करण्याचा आदेश दिला होता. भुजबळांना असलेल्या अन्य आजारांवर उपचार करण्याचा अधिकार रुग्णालयाला दिला नव्हता, असे म्हणत विशेष न्यायालयाने डॉ. लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले.