शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण सीबीआयकडे

By admin | Updated: May 9, 2014 22:23 IST

तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाभोलकर कुटुंबिय, अंनिस व पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

पुणे : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाभोलकर कुटुंबिय, अंनिस व पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र पुणे पोलिसांची जबाबदारी संपलेली नसून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने त्यांनी आणखी मेहनत घेऊन याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.हमीद दाभोलकर : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. न्यायालयाच्या देखरेखेखाली हा तपास व्हावा अशी मागणी आम्ही केली होती. एका यंत्रणेकडून दुसर्‍या यंत्रणेकडे तपास सोपविताना होणारी अक्षम्य दिरंगाई याप्रकरणात होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने दिलेला संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करून कुटुंबिय, अंनिसचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू.भाई वैद्य (ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते) : डॉक्टरांचा खून झाला त्या २० ऑगस्ट २०१३ या दिवशीच ससून हॉस्पिटल येथे याप्रकरणाचा तपास सीबीआयकडून व्हावा अशी मागणी मी केली होती. न्यायालयानेच ती जबाबदारी सीबीआयकडे दिली ते योग्यच झाले. सीबीआयने याप्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावावा अशी अपेक्षा करूयात.अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, अंनिस) : डॉक्टरांच्या खुनाचा तपास कोणाकडून व्हावा, ते कोण करतेय हे फारसे महत्त्वाचे नाही तर सुत्रधाराचा छडा कधी लागणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तपास लागत नसल्याने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. तपास सीबीआयकडे गेला याचा अर्थ महाराष्ट्राचे राज्यकर्ते व पोलिसांची यातून सुटका झाली असे त्यांनी समजू नये.सुभाष वारे (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, आप) : डॉक्टरांचा खून झाल्यानंतर सुरूवातीच्या कालावधीतील तपास महत्त्वाचा होता. त्यावेळी पुणे पोलिसांची ढिलाई झाली त्यामुळे सुत्रधारांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणार्‍या कार्यकर्ते या तपासाकडे डोळे लावून बसले आहेत.विनोद शिरसाठ (संपादक, साधना) : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपास करण्याच्या क्षमता पुणे पोलिसांकडे आहेत की नाही किंवा सीबीआय याचा सक्षमपणे तपास करेल का याबाबत आपण अधिकारवाणीने सांगू शकत नाही. तज्ज्ञांना याबाबत सल्ला घेऊन राज्यशासनानेच याप्रकरणाचा तपास कुणी करावा याचा निर्णय घ्यावा अशी भुमिका आम्ही यापुर्वीच मांडली होती. सीबीआयने सुत्रधारांचा शोध लावावा अशी अपेक्षा करूयात.