शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नागेंद्र, देगलूरकर ‘श्री गुरुजी’ पुरस्काराचे मानकरी

By admin | Updated: February 28, 2017 03:29 IST

यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा ५ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे.समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना जनकल्याण समितीतर्फे संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव सदाशिव गोळवलकर तथा प.पू. श्री गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे बाविसावे वर्ष आहे. २१ वर्षांत ६० व्यक्ती अथवा संस्थांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी समाजजीवनाची १० क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून त्यांची पाच गटांत विभागणी केली आहे. प्रतिवर्ष एकेका गटातील दोन क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जातो. वाङ्मय व सेवा गट, क्रीडा व कृषी, कला व समाजप्रबोधन, धर्म-संस्कृती व अनुसंधान, पर्यावरण व महिला सक्षमीकरण या पाच गटांतील दोन क्षेत्रे निवडली जातात. यंदाच्या वर्षी पुरस्कारासाठी धर्म-संस्कृती क्षेत्रासाठी पंढरपूरचे ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर, तर अनुसंधान क्षेत्रासाठी बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे डॉ. एच.आर. नागेंद्र यांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश, असे आहे. या पत्रकार परिषदेला संघाच्या कोकण संभाग उपाध्यक्ष अलका जोगळेकर, बाळकृष्ण महाराज पाटील, दादासाहेब कल्लोळकर, दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)>श्रीगुरुजी पुरस्कार वितरण सोहळ््याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर तर प्रमख वक्ते म्हणून रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (बंगळुरू) उपस्थित राहणार आहेत.