शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकातही ‘सरकारी’ फसवणूक

By admin | Updated: March 24, 2015 00:14 IST

माणगाव येथील स्मारक : दहा कोटींची नुसतीच घोषणा : कवडीचा निधी नाही, आराखडा तरी दूरच

विश्वास पाटील (कोल्हापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्मारकाबाबत राज्य सरकारच आंबेडकरी जनतेसह समस्त महाराष्ट्राचीही कशी फसवणूक करत आहे हे उघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशनात या स्मारकासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दहा कोटींची घोषणा केली परंतु त्यातील एक रुपयाही या स्मारकासाठी आजअखेर आलेला नाही. या स्मारकाबद्दल स्थानिक पातळीवर सगळ््याच यंत्रणा हात वर करत असून, बाबासाहेबांच्या स्मारकाला कुणी वालीच नाही की काय, अशी सध्याची स्थिती आहे. माणगाव परिषदेला आंबेडकरी चळवळीमध्येच नव्हे, तर एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळे महत्त्व आहे. २२ मार्च १९२० ला तिथे भारतातील पहिली बहिष्कृत वर्गाची परिषद राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाली. शाहू महाराजांनी त्या परिषदेत आंबेडकर यांचे मोठेपण सांगून ‘हा तुमचा पुढारी,’ तुमच्या स्वाधीन करत असल्याचे जाहीर केले होते. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला त्यातून प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे स्मारक व्हावे, अशी इच्छा आंबेडकर जनतेची गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्यासाठी पहिल्यांदा २००९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पाच कोटी रुपये मंजूर केले परंतु हा निधी खर्चच झाला नाही. कारण तो खर्च कशावर करणार, हा प्रश्न होता. त्यानंतर पुन्हा चार-पाच वर्षे कुणालाच काही आठवले नाही. तोंडावर विधानसभेच्या निवडणुका दिसू लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी पक्षाच्या बैठकीत स्मारकाबाबत पक्षाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केल्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निधी मंजूर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. त्यानुसार गेल्यावर्षी ८ जूनला पावसाळी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी स्मारकासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली परंतु ती घोषणा व निधीही हवेतच आहे. स्मारकाची फाईल मंत्रालयात पडून आहे आणि बाबासाहेबांचे अनुयायी तर स्मारकाचा विषयच विसरून गेले आहेत. सर्वांनीच हात झटकलेराज्याच्या अर्थसंकल्पात राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील स्मारकालाही गिन्नीची तरतूद झाली नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत चौकशी केली असता जिल्हा नियोजन कार्यालयाने समाजकल्याणचा निधी थेट त्या विभागाकडे येत असल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी स्मारकाचा विषय मंत्रालयाच्या स्तरावर सामान्य प्रशासन विभाग हाताळतो, त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगून हात झटकले. हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे यांनी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम या पातळीवर होते व ते पूर्ण केल्याचे सांगितले.