शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण: अंदुरे-तावडेने रचला कट; सीबीआयचा कोर्टात दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:47 IST

महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण; २६ आॅगस्टपर्यंत कोठडी

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी केला. हत्येचा सखोल तपास करून सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अंदुरेला कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्याला २६ आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला शनिवारी अटक केली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे युक्तीवादात म्हणाले, दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या अंदुरेला पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण कोणी दिले? हत्येसाठी आवश्यक बाबी त्याला कोणी पुरविल्या? हत्येसाठी वापरलेले वाहन व शस्त्र जप्त करण्यासाठी व सखोल तपासासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी.बचाव पक्षाकडून अ‍ॅड. प्रशांत साळशिंगीकर यांनी बाजू मांडली. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक झाली होती. तेव्हा सीबीआयकडून दाखल केलेल्या दोषारोप पत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. अकोलकर आणि पवार हे दोघे फरार असून त्यांचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात अंदुरेचा उल्लेखही नव्हता.शस्त्र व गाडी यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. बंदुकीबाबत मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती. त्यामुळे आता अंदुरेला अचानक अटक का करण्यात आली? १४ आॅगस्टला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अंदुरेला चौकशीसाठी बोलाविले होते.चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने अंदुरेला चौकशीसाठी बोलाविले आणि अटक केली. त्याचा या गुन्ह्यात काहीच सहभाग नसून खोटे आरोप करून त्याला गोवण्यात येत आहे, असा आरोप अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने अंदुरेला सीबीआय कोठडी सुनावली.आज पाचवा स्मृतिदिनडॉ. दाभोलकरांच्या हत्येला सोमवारी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाचव्या स्मृतिदिनी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज आणि दिग्दर्शक अमोल पालेकर सहभागी होणार आहेत. सकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गीतांमधून अभिवादन करण्यात येईल. पूलापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येईल. ११ वाजता ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत.अंदुरेने झाडली तिसरी गोळी?अंदुरे मोटारसायकल चालवित होता, त्याचा साथीदार पाठीमागे बसला होता. साथीदाराने डॉ. दाभोलकरांवर दोन गोळ््या झाडल्या तर तिसरी गोळी अंदुरेने झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे पिस्तुल होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.माझा पती निर्दोष; सीबीआयने फसवलेमाझा पती निर्दोष आहे, त्यांना फसवण्यात आले आहे. एटीएसने त्यांना औरंगाबादला घरी आणून सोडल्यानंतर सीबीआयने चौकशी करतो म्हणून नेले आणि अडकवले, असा आरोप सचिनची पत्नी शीतल यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून