मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक महाराष्ट्र सरकारशी सल्लामसलत करून दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता विनाविलंब करण्यास सरकार बांधील आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबईतील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या सन्मानास साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी बांधील
By admin | Updated: December 6, 2014 02:53 IST