मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील ज्या घरात वास्तव्य होते त्या घराची किंमत २९ आणि ३० कोटी रुपये असल्याचा अहवाल दोन व्हॅल्युअर कंपन्यांनी दिला आहे. मंत्रालयात आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अहवालांवर चर्चा झाली. यातील एक कंपनी राज्य शासनाने तर दुसरी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने नेमली होती. दोन्ही अहवालांचा अभ्यास केल्यानंतर शासन पुढील पाऊल उचलेल. या घराच्या खरेदीसाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेबांच्या लंडनमधील घराची किंमत ३० कोटी रु.
By admin | Updated: August 5, 2015 01:10 IST