शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: August 26, 2015 03:33 IST

दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याकरिता ४२५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याकरिता ४२५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू यांनी हा प्रस्ताव दिला आहे. याखेरीज जेकब व मेकफर्लेन या फ्रेंच कंपनीनेही आपले आराखडे सादर केले असले तरी खर्चाचा तपशील सादर केलेला नाही.शशी प्रभू यांचे सादरीकरण हे अधिक सखोल असून त्यांनी स्मारकाच्या खर्चाचा तपशील दिला आहे. प्रवेशद्वार, स्तूप, वाहनतळ क्र. १ व २, म्युझियम, वाचनालय, सभागृह, लोकांना एकत्र जमा होण्याचे ठिकाण आणि विविध सेवा याकरिता २३ हजार २९५ चौरस मीटर बांधकाम करण्याकरिता २१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याचे बांधकाम पाडून टाकणे, आवार भिंत बांधणे, सौर ऊर्जेद्वारे पाणी उकळण्याची यंत्रणा बसवणे, मलनि:सारण व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा निर्माण करणे, विद्युतीकरण अशा विविध कामांचा विचार करता ३८६ कोटी खर्च होणार असून शशी प्रभू यांची सल्लागार या नात्याने फी ३८ कोटी ६५ लाख रुपये असणार आहे.स्मारकाच्या उभारणीबाबत निर्णय घेण्याकरिता मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.ए. मदान यांना दिल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)