शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अनैतिक संबंधातून विधवेचा विळ्याने खून

By admin | Updated: December 30, 2016 21:54 IST

हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली. वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत

हिवरासंगम, दि. 30 - अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना महागाव तालुक्याच्या हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली. वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तिचा दीर पिंटू उर्फ प्रकाश दगडू चवरे व सासू सिंधूबाई दगडू चवरे यांना महागाव पोलिसांनी खुनाच्या आरोपात अटक केली. गुरुवारी रात्रीच अनिताचा खून करण्यात आला. शुक्रवारी पहाटे अनिताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत तिच्याच अंगणात आढळून आला. तिच्या अंगावर विळ्याचे वार करण्यात आले होते. हा विळा तिच्या मृतदेहाशेजारीच पडून होता. अनिताचा दीर प्रकाश चवरे याने महागाव पोलिसांकडे खुनाच्या या घटनेची सकाळीच फिर्याद नोंदविली. शिवाय या खूनप्रकरणी अनिताचे अनैतिक संबंध असलेल्या गावातीलच बंडू वारंगे याच्यावर संशय व्यक्त केला. महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रक्ताचे डाग प्रकाशच्या घरापर्यंत आढळून आले. त्यामुळे पोलिसांना प्रकाशवर संशय बळावला. अखेर बाजीराव दाखविताच प्रकाशने गुन्हा कबूल केला आणि खुनाच्या या प्रकरणात मृताच्या प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादी दीरच आरोपी निघाला. पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनीही घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, अनिता चवरे हिच्या पतीने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सासू सोबत पटत नसल्याने ती मुलगा देवानंद (९) व मुलगी ऋतुजा (७) यांच्याासह शेजारीच वेगळी राहत होती. त्यांच्या बाजूलाच सासू व दीर राहत होते. अनिताचे गावातीलच बंडू काळूराम वारंगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा सासूला संशय होता. याच कारणावरून सासू-सुनेचे नेहमी भांडण व्हायचे. सासूने या अनैतिक संबंधाबाबतचा संशय तंटामुक्त समितीकडे लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. दरम्यान गुरुवारच्या रात्री अनिताचा खून करण्यात आला. तिची मुलगी या खुनाची साक्षीदार असावी, असा पोलिसांना संशय आहे. सकाळी खून झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तपास चक्रे फिरवून महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी खुनाचा छडा लावला आणि दोनही आरोपींना गजाआड केले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, फौजदार पावरा, बिट जमादार देवाशिष पवार, पोलीस कर्मचारी युवराज जाधव, प्रशांत, सुरेश पवार, महिला पोलीस शिपाई किरणताई आडे आदी या तपासात मदत करीत आहे. कुटुंबाची वाताहत सहा ते सात सदस्यांचे कुटुंब असलेल्या चवरे परिवाराची वाताहत झाली आहे. मृतक अनिताचा सासरा दगडू चवरे यांनी चार वर्षांपूर्वी घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. तर तिचा पती अशोक याने अंगावर रॉकेल ओतून तुराटीच्या गंजीवर बसून स्वत:ला जीवंत जाळून घेतले. आता अनिताचाही खून झाला आणि त्यात सासू व दीर अटकेत आहेत. त्यामुळे अनिताच्या चिमुकल्या मुला-मुलीची वाताहत झाली आहे.