शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दारूकांडात हत्येचे कलम जोडणार

By admin | Updated: July 10, 2015 03:58 IST

मालवणी दारूकांडातील आरोपींनी कट रचून १०४ जणांची हत्या केली, या निष्कर्षापर्यंत गुन्हे शाखा पोहोचली आहे. त्यानुसार या प्रकरणी गजाआड असलेल्या

जयेश शिरसाट  मुंबईमालवणी दारूकांडातील आरोपींनी कट रचून १०४ जणांची हत्या केली, या निष्कर्षापर्यंत गुन्हे शाखा पोहोचली आहे. त्यानुसार या प्रकरणी गजाआड असलेल्या ९ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही गुन्हे शाखेने घेतला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल.१८ जूनला मालवणीतल्या ३ गुत्त्यांवरील गावठी दारूमुळे विषबाधा होऊन १०४ जणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन व व्हिसेरा चाचणीतून मृतांच्या शरीरात निव्वळ मिथेनॉल हे विषारी औद्योगिक रसायन आढळले. या गुत्त्यांवरून मिथेनॉलमिश्रित पाणी गावठी दारू म्हणून ग्राहकांना पाजण्यात आली हे स्पष्ट झाले.या प्रकरणी मन्सूर लतीफ खान उर्फ आतीक, किशोर पटेल, सलीमुद्दीन शेख आणि फ्रान्सीस डीमेलो हे चार मुख्य आरोपी आहेत. एरव्ही गुत्त्यांवर गावठी दारूमुळे अधिक नशा यावी म्हणून त्यात काही प्रमाणात मिथेनॉल मिसळण्याची प्रथा रूढ होती. पण या प्रकरणात तर गावठी नव्हतीच; फक्त मिथेनॉलच होते, असे गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आले.मिथेनॉल विषारी असून, ते जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास तो माणूस दगावू शकतो, याची जाणीव चौघांनाही होती. हत्येचे कलम जोडण्यासाठी आरोपींचा हेतू किंवा इरादा स्पष्ट होणे आवश्यक होते. त्याशिवाय हे कलम न्यायालयात टीकू शकले नसते. मात्र आरोपींचा हेतू स्पष्ट झाला असून, तो न्यायालयात सिद्ध होईल इतपत पुरावे हाती आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. अटक आरोपींचे उद्या रिमांड असून, त्याआधीच मालवणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हत्येचे कलम जोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.