शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नीटचे सर्व्हर दुस-या दिवशीही डाऊनच

By admin | Updated: April 23, 2017 18:56 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षेच्या हॉल तिकीटची प्रिंट आऊट काढण्यासाठी

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 23 -  वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षेच्या हॉल तिकीटची प्रिंट आऊट काढण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. मात्र दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे. पहिल्या दिवशी सर्व डाऊन असल्यामुळे हॉलतिकिट निघाले नाही. दुसऱ्या दिवशी हॉलतिकिट निघण्याच्या आशेने विद्यार्थी दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र हॉलतिकिट काही निघाले नाही. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या  नीट  परीक्षेचे हॉलतिकिट  सीबीएसईएनईईटी या वेबसाईटवर शनिवारी सकाळी अपलोड करण्यात आले आहे. अपलोड केल्याच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजेपासूनच सर्वर डाऊन असल्यामुळे दिवसभर कोणालाही हॉलतिकिट काढता आले नाही. किमान दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २३) सर्वर सुरु होण्याची विद्यार्थ्यांना आपेक्षा होती. मात्र वेबसाईटचे सर्वर दुसऱ्या दिवशीही डाऊनच असल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकिट काढता आले नाही. यामुळे हॉलतिकिटमध्ये एखादी चुक झाली असेल तर ती दुरुस्त केव्हा करता येणार याविषयी कोणतीही गाईडलाईन मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट परीक्षा आवघ्या १५ दिवसावर आलेली असताना असा प्रकार घडत असल्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत आहेत.तक्रार कोणाकडे करावी?नीट परीक्षेची हॉलतिकिट मिळविण्यात आडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी परीक्षार्थींनी सीबीएसई कडे इममेल, फोनद्वारे केल्या होत्या. मात्र या तक्रारींची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. यातच मुंबई आणि दिल्ली येथेच नीटचे नियोजनाचे केंद्र असल्यामुळे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून  लोकमतकडे याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दिल्ली, मुंबईतील नीट केंद्राचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परीक्षार्थींसह पालकही चिंतेत आहेत. ऐनवेळी काही गडबड झाल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसानीला कोण जाबाबदार राहणार असा सवाल पालकांनी  लोकमतशी बोलताना व्यक्त केला.