शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क माफ

By admin | Updated: December 24, 2015 02:20 IST

राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे : राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले आहे.शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार संबंधित गावांतील दहावीतील मुलांचे परीक्षा अर्ज भरून घेताना त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात आले नाही. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात आले नसल्याची माहिती राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडून कळविण्यात आली आहे. त्यात नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून मुंबई, कोकण विभागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क माफ झाले नाही. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर ग्रामीण मधील १११ गावांमधील १३१ विद्यार्थ्यांचे आणि गडचिरोली जिल्ह्णातील ३६७ गावांमधील १ हजार ९०७ विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्णात एकही गाव दुष्काळग्रस्त नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली नाही.मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला व यवतमाळ जिल्ह्णात दुष्काळग्रस्त गावे आहेत. मात्र, या जिल्ह्णातील शाळांपर्यंत परीक्षा शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती न पोहचल्यामुळे या विभागातील सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणी करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा प्रशासन स्तरावर हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचेही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)