शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: February 16, 2017 03:53 IST

विषारी औषध पिवून दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर

नवी मुंबई : विषारी औषध पिवून दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर कोपरखैरणेतील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रबाळे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.घणसोली सेक्टर ७ सिम्प्लेक्स येथील श्री गणेश सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. नंदा माने (४०) व प्रकाश माने (४५) अशी त्यांची नावे आहेत. नंदा या जमिनीवर कोसळल्याचे शेजाऱ्यांना समजताच त्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. प्रकाश माने यांची देखील प्रकृती अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे लगतच्या रहिवाशांनी दोघांनाही कोपरखैरणेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी नंदा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर प्रकाश यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. झाडांवर कीटकनाशक फवारणीसाठी वापरायचे औषध पिवून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. हे औषध अनेक महिन्यांपासून त्यांच्या घरात ठेवण्यात आले होते. प्रकाश माने यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोसायटी आवारातच त्यांचा फेरीवाला व्यवसाय होता. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा शिक्षण घेत आहे. दोन्ही मुले घराबाहेर गेलेली असताना त्यांनी हा प्रकार केला. मात्र या दाम्पत्याने आत्महत्या करण्यामागचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. (प्रतिनिधी)