शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत वायुगळतीची नऊ कामगारांना बाधा

By admin | Updated: September 21, 2016 03:45 IST

रामचंद्रनगर परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी हिंदुस्थान मोनोमर्स कंपनीत वायुगळती झाली.

डोंबिवली : नाल्यात सोडलेल्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे रामचंद्रनगर परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी हिंदुस्थान मोनोमर्स कंपनीत वायुगळती झाली. परिसरातील अन्य कंपन्यांमधील नऊ कामगारांना त्याची बाधा झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, कंपन्या बंद असल्या तरीही वायुप्रदूषण होत असल्याने कंपन्या छुप्या पद्धतीने सुरू आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व कंपन्यांची एकदा तरी पाहणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.डोंबिवली औद्योगिक पट्ट्यातील फेज दोनमध्ये असलेली हिंदुस्थान मोनोमर्स कंपनी कच्च्या मालाचे उत्पादन करते. या कंपनीत ४० कामगार विविध शिफ्टमध्ये काम करतात. मात्र रविवारी सुटीमुळे ही कंपनी बंद होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या कंपनीत डायमिथाईल सल्फेट हे रसायन होते. दोन पाइपमधील गॅसकटरमधून रसायनाची गळती झाली. त्यामुळे आजूबाजूला सुरू असलेल्या कंपनीतील नऊ कामगारांना त्याची बाधा झाली. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इतर कामगारांनी त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी तीन कामगारांना प्रथमोपचार करून तत्काळ घरी सोडण्यात आले. तर इतर सहा कामगारांना मंगळवारी सकाळी सोडण्यात आले. मॅथेनॉल आणि सल्फर डायआॅक्साइड या रसायनांचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने त्याची बाधा झाली. या रसायनाचा परिणाम त्वरित दिसून येत नसला तरी १० तासानंतर त्याचे दुष्पपरिणाम जाणवतात. हे रसायन अतिघातक नसल्याने केवळ काही तासांसाठी त्याचा त्रास जाणवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कंपनीला बंदची नोटीस नाहीप्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथ औद्योगिक विभागातील १४२ कंपन्यांना बंदची नोटीस बजावली आहे. त्यानुसार डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्या बंद आहेत. मात्र, या कंपनीचा त्यात समावेश नाही. तसेच या कंपनीतील रसायन हे उघड्या नाल्यांमध्ये सोडले जात नाही. ते शून्य लिक्विड डिस्चार्ज अर्थात रसायनावर प्रक्रिया करून ते जागीच नष्ट केले जाते. त्यामुळे या कंपनीला बंदीची नोटीस नव्हती.