शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीपूर्वी दस्त नोंदणी दुप्पट

By admin | Updated: July 3, 2017 04:37 IST

वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू होणार असल्याने अनेकांनी घर, जमीन खरेदी-विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे जूनच्या शेवटच्या १५ दिवसांत खरेदी-विक्रीचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू होणार असल्याने अनेकांनी घर, जमीन खरेदी-विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे जूनच्या शेवटच्या १५ दिवसांत खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार झाल्याचे दिसून आले. काही महिन्यांपासून रिकाम्या पडलेल्या सदनिकांची विक्री झाल्याने बांधकाम व्यावसायिक समाधानी झाले तर दुसरीकडे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दस्त नोंदणीचा आकडा दुप्पट झाल्याची माहिती समोर आली.जीएसटी लागू होण्याच्या एक दिवस आधी राज्यात ८ हजारांपेक्षा जास्त दस्त नोंदणी झाली. शहरातील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून नोंदणीसाठी चांगलीच गर्दी केली होती. जीएसटी लागू होण्यापूर्वी सदनिका, घर आणि खरेदी-विक्री व्यवहाराबाबत दस्त नोंदणी केलेले जीएसटी करप्रणालीत येणार नसल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांची पूर्ण रक्कम दिलेली नसेल तर नंतर जीएसटीनुसार १२ टक्के कर द्यावा लागेल. बांधकाम व्यावसायिकांच्या हाती रक्कम मिळाल्याचा दिवस त्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्यभरात ८ हजार ६४ दस्तांची नोंदणी झाली असून त्यापोटी ५८.७५ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात ६ लाख १५ हजार ५५७ दस्त नोंदणी झाली आहे. घरे, सदनिका खरेदी-विक्री व्यवहाराबाबत ३० जूनपूर्वी दस्त नोंदणी केलेले जीएसटी कर प्रणालीत येणार नसल्याचेही राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरिक्षक अनिल कवडे यांनी सांगितले.