शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांसाठी ‘डीपी’चे द्वार खुले

By admin | Updated: April 29, 2016 03:05 IST

ना विकास क्षेत्राचे द्वार परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी उघडल्यानंतर या जागांवर सामाजिक उपक्रमांकरिता पहिल्यांदाच विकास नियोजन आराखड्यातून आरक्षण करण्याचे प्रस्तावित आहे़

मुंबई : ना विकास क्षेत्राचे द्वार परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी उघडल्यानंतर या जागांवर सामाजिक उपक्रमांकरिता पहिल्यांदाच विकास नियोजन आराखड्यातून आरक्षण करण्याचे प्रस्तावित आहे़ यामध्ये वृद्धाश्रम, महिला व बाल कल्याण केंद्र, आधार केंद्र, बेघरांसाठी निवारा अशा सेवांकरिता आरक्षणाची शिफारस आहे़ २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी शहराच्या विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला़ मात्र त्यामध्ये अनेक शिफारशींवरून वाद उभा राहिला़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ हा सुधारित आराखडा विशेष अधिकारी रामनाथ झा यांनी बुधवारी पत्रकारांसमोर जाहीर केला़ यामध्ये मुंबईतील चटईक्षेत्र निर्देशांक २ ते ५ पर्यंत वाढविण्यात आला आहे़ना विकास क्षेत्र विकासासाठी खुले करण्याचा मुद्दा प्रामुख्याने वादात सापडला होता़ सुधारित आराखड्यात ना विकास क्षेत्र गृहनिर्माण आणि सामाजिक उपक्रमांसाठी खुले करण्यात आले आहे़ येथील तिवर व नैसर्गिक वनजीव, सागरी नियंत्रण क्षेत्र या परिसरात कोणत्याही प्रकारच्या विकासाला परवानगी नसेल, अशी हमी आयुक्त अजय मेहता यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षणना विकास क्षेत्रावरील पूर्वीचा ०़२० एफएसआय ०़४० करण्यात आला आहे़ म्हणजेच ५० टक्के एफएसआय जमीन मालकाला मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के राखीव जागेवर परवडणारी घरे व सामाजिक उपक्रमांसाठी बांधकाम करण्यात येईल़ म्हणजेच ३० हजार चौ़मी़च्या ना विकास क्षेत्रावर दोन एफएसआय मिळाल्यास एकूण ६० हजार चौ़मी़ बांधकाम शक्य होईल़ हे ३० हजार चौ़मी़ पालिकेला सामाजिक उपक्रमांसाठी वापरता येणार आहे़ जमीन मालकाला घरे बांधून पालिकेच्या ताब्यात द्यावी लागतील आणि पालिका लॉटरीच्या माध्यमातून वितरण करेल.>या त्रुटी दूर करणार खासगी जमिनीतूनही आरक्षित करण्यात आलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या प्रस्तावांना वगळण्यात आले आहे़ फेरीवाल्यांची समस्या व त्यासाठी तरतुदींना आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे़झोपडपट्ट्यांची नोंद झाली नव्हती, याबाबत आरोप होत होते़ हे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आहे़>मिठागरांवर गृहनिर्माणमुंबईतील मिठागरांवर कोणत्याही प्रकारच्या विकासाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही़ यासाठी केंद्राकडून परवानगी आवश्यक असताना पालिकेने विकास आराखड्यात अशी तरतूद केल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ परवडणाऱ्या घरांसाठी मिठागरांची जागा खुली करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार करून केंद्राकडे पाठविला आहे़ यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली होती़ मात्र अद्याप याबाबत केंद्राने धोरण निश्चित केलेले नाही़