शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोठेबाबा’ची दारे महिलांना खुली

By admin | Updated: May 19, 2017 01:19 IST

मोठेबाबा (मोठादेव) मंदिरातील महिला प्रवेश बंदी हटवून स्त्री-पुरुष भेदाभेद संपवून समतेची गुढी उभारण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीच्या तृप्ती देसाई कोतूळ

- लोकमत न्यूज नेटवर्क

कोतूळ (जि. अहमदनगर) : मोठेबाबा (मोठादेव) मंदिरातील महिला प्रवेश बंदी हटवून स्त्री-पुरुष भेदाभेद संपवून समतेची गुढी उभारण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीच्या तृप्ती देसाई कोतूळ येथे येत आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत त्यांनी थेट ‘लोकमत’शी संपर्क साधून येत्या ३० मे रोजी महिला कार्यकर्त्यांसह या मंदिरात प्रवेश करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी कोतूळ येथे पहिली महिला परिषद घेऊन समतेचा संदेश दिला. त्याच कोतूळमधील मोठादेव बाबा मंदिराच्या कमानीवर महिलांना प्रवेश बंद असल्याचा फलक आजही झळकत आहे. मंदिर प्रशासनानेदेखील या ‘समतेच्या’ विचाराला सहमती दर्शवली. परंतु ही प्रथा दीडशे वर्षे चालत आल्याने महिलाही अनामिक भीतीपोटी मंदिरात जात नाहीत. मात्र हे केवळ एक मिथक असल्याचे मंदिराच्या व्यवस्थापक कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनीही महिलांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता तृप्ती देसार्इंच्या मंदिर प्रवेशातून कोतूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानंतर थेट पंचाहत्तर वर्षांनी समतेची गुढी उभारली जाणार आहे. देसाई मंदिर व्यवस्थापक कुटुंबासह गावातील महिला सरपंच, उपसरपंच यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच त्या स्वत: मोठादेव बाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत. समतेची गुढीतृप्ती देसार्इंच्या मंदिर प्रवेशातून कोतूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानंतर थेट पंचाहत्तर वर्षांनी समतेची गुढी उभारली जाणार आहे. देसाई त्या मंदिरात दर्शन घेणार आहेत.