शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव टोल बुथ हटविणार

By admin | Updated: January 29, 2015 01:02 IST

वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथील बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत (बुथ) हटविण्याबाबत प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीला पाठविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.

जिल्हाधिकारी : प्रस्ताव दिल्लीला पाठविलानागपूर : वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथील बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत (बुथ) हटविण्याबाबत प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीला पाठविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बुधवारी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक झाली. यात उद्योजकांकडून आलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए.पी. धर्माधिकारी व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वाडी ते हिंगणा औद्योगिक क्षेत्रात १ फेब्रुवारीपासून बससेवा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. डोंगरगावचा बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत हटविण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जमीन अकृषक करण्यासाठी १८ प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात. ही प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी केली जाईल. यासंदर्भात काही सूचना असल्यास त्याचे स्वागत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.हळदगाव खदान ते वर्धा रोड हा रस्ता खनिज निधीतून तयार करणे, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात खंडित होणारा वीज पुरवठा, बुटीबोरी येथे ईएसआयसी हॉस्पिटल, टी पॉईन्टवर सिग्नलची व्यवस्था, वटेघाट व पोही येथे शासकीय जागा ताब्यात घेणे, उमरेड औद्योगिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हिंगणा औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील मद्य विक्री आदीबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)