शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

खिल्ली उडवणाऱ्या ‘डें’ची पोलिसांनी काढली शोभा

By admin | Updated: February 23, 2017 07:02 IST

लेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणारे टिष्ट्वट बुधवारी

मुंबई : लेखिका शोभा डे यांनी  मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणारे टिष्ट्वट बुधवारी केले़ मुंबई पोलिसांनी या टिष्ट्वटला ‘जशास तसे’ उत्तर  दिले. त्यावरही शोभा डे यांनी  खोचक असे प्रत्युत्तर दिले. दिवसभर सोशल मीडियावर हा विषय चर्चेत होता. मंगळवारी मतदान केल्यानंतर शोभा डे यांनी पोट सुटलेल्या एका जाडजूड पोलिसाचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला. त्यावर ‘हेवी पोलीस बंदोबस्त’ अशा आशयाच्या मजकुराने पोलिसांची खिल्ली उडवणारे कॅप्शनही टाकले. सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला.  त्यावर चर्चा रंगली, रिप्लाय आले. जवळपास १ हजार २० जणांनी त्याला रिप्लाय केले. ३८० लोकांनी त्यावर रिटिष्ट्वट केले. १ हजार लोकांनी त्याला लाइक केले. या फोटोवरून चर्चा  रंगत असताना, या टिष्ट्वटची  माहिती पोलिसांनी समजली. काहीही संबंध नसलेला फोटो टिष्ट्वट करून  शोभा डे मुंबई पोलिसांची  बदनामी केली़ याने संतप्त  झालेल्या पोलीस दलाने त्यांच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून प्रत्युत्तर दिले व शोभा डेंची बोलतीच बंद केली.  ‘मस्करी करायला आम्हालाही आवडते. फोटोतील पोलीस आमचा नाही. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत,’ असा टोला मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना लगावला आहे.  त्यावर शोभा डे यांनी  टिष्ट्वटद्वारेच उत्तर दिले आहे, ‘मुंबई/ महाराष्ट्र पोलीस प्रणाम... कुणाला खिजविण्याचा हेतू  नाही. समाजमध्यमांमध्ये फिरणारा  हा फोटो खरा असेल, तर डायटेशनचा सल्ला जरूर घ्यावा,’ अशी  मल्लीनाथी शोभा डे यांनी प्रत्युत्तराच्या टिष्ट्वटद्वारे केली आहे.  (प्रतिनिधी)