शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेतील ‘शोले’चा डोंबिवलीत शो

By admin | Updated: June 28, 2016 02:52 IST

भाजपा व शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांत सध्या राज्यस्तरावर सुरू असलेली नळावरील भांडणे आता थेट सांस्कृतिकनगरीतही रंगली

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- भाजपा व शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांत सध्या राज्यस्तरावर सुरू असलेली नळावरील भांडणे आता थेट सांस्कृतिकनगरीतही रंगली आहेत. डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर होताच भाजपाने या कामाचे श्रेय लाटण्याकरिता फलक लावला. लागलीच शिवसेनेने ‘करून दाखवले’चे बोर्ड लावले. महापालिकेत युती असलेल्या पक्षांचे स्वतंत्र फलक हा गावभरच्या चर्चेचा विषय झाला आहे.विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्याचीच पुनरावृत्ती कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये झाली. केवळ वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानत स्थानिक आमदारांसह कार्यकर्त्यांना युती स्वीकारावी लागली. नुकत्याच झालेल्या महासभेत आणि स्थायीच्या सभेत येथील पूर्व-पश्चिम असे डोंबिवली-ठाकुर्ली जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या खर्चाला मंजुरी मिळाली. उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी डोंबिवलीत शहरभर मोठे होर्डिंग लागले आहेत. मात्र, त्यात युती कुठेच दिसून येत नाही, हे विशेष. सर्वात आधी भाजपाचा बोर्ड लागला. त्याला जशास तसे उत्तर म्हणून शिवसेनेने जागा मिळेल तिथे (मोक्याच्या ठिकाणी) होर्डिंग्ज लावत मित्रपक्षावर कुरघोडीचा प्रयत्न केला.भाजपाच्या मते सध्या स्थायी समितीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याने सभापती संदीप गायकर यांनी प्रकल्पाच्या २३ कोटी ३७ लाख २८ हजार ४१३ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. तर, शिवसेनेच्या मते निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने त्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे हे स्थायीचे सभापती होते. त्यामुळे हे श्रेय त्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात येऊन निवडून आलेले विकास म्हात्रे यांनीही होर्डिंग्ज लावले आहेत. त्यात त्यांनी आजी-माजी सभापतींसह युतीमुळे हा प्रकल्प तडीस जात असल्याचे दर्शवले आहे.भाजपाने मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले आहे. बहुधा, तेच शिवसेनेच्या मोरेंना खटकले असून त्यासाठी त्यांनीही स्वतंत्रपणे बोर्ड लावल्याची सर्वत्र चर्चा आहे.>विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी केडीएमसीतील भाजपाने कंबर कसली होती. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील आमदारांसह नगरसेवकांचे तोंडभरून कौतुक केले होते. विधान परिषद निवडणुकीतील सख्य लागलीच संपुष्टात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.