शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत गुंडाची हत्या

By admin | Updated: April 7, 2017 03:36 IST

पैशांच्या देवणघेवणीवरू न चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील एमआयडीसी फेज एक परिसरात बुधवारी रात्री घडली.

डोंबिवली : कुख्यात गुंड विठ्ठल नवगरे (३५) याची पैशांच्या देवणघेवणीवरू न चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील एमआयडीसी फेज एक परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुरुवारी दुपारी सदाशिव भोगटे (३७) आणि आनंद गुंजाळ (३३, दोघेही रा. आजदेगाव) यांना मानपाडा रोडवरील एका हॉटेलमधून अटक केली. कल्याण न्यायालयाने त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.एमआयडीसी परिसरात एका ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्या पोटावर भोसकल्याच्या खुणा असल्याचे मानपाडा पोलिसांना समजले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे व त्यांच्या पथकाने शोध घेऊन मृताची ओळख पटवली. तेव्हा तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मूळचा वाशिम व सध्या अंबिवली येथे राहणारा विठ्ठल असल्याचे समजले. त्याच्याविरोधात १९९९ ते २००८ या काळातील मारामारी, दारोडे, लुटमारीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. विठ्ठल आणि सदाशिव यांची ओळख पाच-सात वर्षांपूर्वी जेलमध्ये झाली होती. त्यावेळी जेलमध्ये विठ्ठलने त्याला मदत केली होती. जेलमधून सुटल्यानंतर हा त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागला. सुरुवातीला त्याने ही मदतीची परतफेड म्हणून काहीवेळा त्याला पैसे दिले. मात्र त्यानंतर विठ्ठलची हिंमत आणखी वाढली. तो तीन-चार वर्षांपासून वरंवार दोन, तीन आणि पाच हजार रुपये सदाशिवक डे मागत होता. परंतु, नेहमी पैसे कुठून द्यायचे, या कारणाने सदाशिव त्रस्त होता. यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याची योजना आखली. सदाशिवने त्याला पैसे घेण्याच्या बहाण्याने एमआयडीसी फेज एकमधील बॉम्बे डाइंग कंपनीजवळ रात्रीच्या सुमारास बोलावले. सदाशिवने त्यासाठी त्याचा मित्र आनंद याची मदत घेतली. विठ्ठल तेथे पोहोचताच त्यांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केली. (प्रतिनिधी)मंचेकर टोळीत सहभागविठ्ठल नवगरे हा सुरेश मंचेकरच्या टोळीतील गुंड असून, तो खंडणी वसुलीही करीत असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते. तर आरोपी सदाशिव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मारामारीचे गुन्हे आहेत.