शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील पादचारी पूल रखडला

By admin | Updated: April 27, 2016 04:03 IST

डोंबिवली आणि मुंब्रा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांच्या डागडुजीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे

डोंबिवली : डोंबिवली आणि मुंब्रा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांच्या डागडुजीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एप्रिल महिना सुरू होताच मुंब्रा स्थानकातील मधला, तर डोंबिवली स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील रेल्वेचे पादचारी पूल प्रवाशांसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने हे काम २५ एप्रिलपर्यंत चालेले, असे म्हटले होते. मात्र तो कालावधी संपूनही पूल वाहतुकीस खुला झालेला नाही. त्याला आणखी आठवडा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.डोंबिवलीत या पुलाचा वापर करणाऱ्या रामनगरसह पश्चिमेकडील पं. दिनदयाळ रोड व कोपर रोडच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना मधल्या ब्रिजपर्यंत यावे लागत असल्याने विशेषत: सकाळच्या वेळेत प्रवासाचे नियोजन कोलमडते. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याची त्यांची मागणी आहे.डोंबिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम ५ ते २५ एप्रिलपर्यंत होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही ते झालेले नाही. या कामामुळे जमा झालेले रेबीट (उपयोगात नसलेला माल) स्थानकातच पुलाखाली व मोकळया जागेत ठेवण्यात आले आहे. मुंब्रा स्थानकातही कल्याण दिशेकडील पुलाचे काम सुरु आहे. ते लवकर पूर्ण व्हावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.