शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘डॉलर’चा झाला ‘रुपया’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 05:03 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे कागदोपत्री ‘डॉलरपती’ झालेले उमेदवार अखेर ‘रुपयाधीश’ झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या शर्यतीत

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे कागदोपत्री ‘डॉलरपती’ झालेले उमेदवार अखेर ‘रुपयाधीश’ झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती ‘डॉलर’मध्ये व सर्वांचे शिक्षण ‘बीए पास’ दाखविण्यात आले होते. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संकेतस्थळावरील ही चूक दूर केली.निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रत्येक उमेदवाराने दाखल केलेले शपथपत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. निवडणुकांसाठी दाखल केलेल्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात उमेदवारांच्या संपत्तीचा उल्लेख हा रुपयांऐवजी चक्क ‘डॉलर’मध्ये करण्यात आला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असलेल्या उमेदवारांची संपत्ती ‘डॉलर्स’मध्ये दाखवत असल्याने प्रत्येक जण ६७ पटींनी श्रीमंत असल्याचे दिसून येत होते. शिवाय उमेदवाराचे शिक्षण कितीही झाले असले तरी प्रतिज्ञापत्रातील सारांश तपशीलात सर्वांचे शिक्षण ‘बीए पास’ असेच दाखविण्यात येत होते. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर नोंद घेतली व बैठका घेऊन तांत्रिक चमूला या त्रुटी हटविण्याचे निर्देश दिले. संकेतस्थळावरून राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे दर्शविणारी ‘लिंक’हटविण्यात आली. (प्रतिनिधी)