शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवाऱ्याअभावी कुत्री भटकीच

By admin | Updated: August 3, 2016 00:47 IST

श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी २ वर्षांपूर्वी पालिकेतर्फे शहराच्या ४ भागांत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात येणार होती. मात्र अद्याप केवळ दोनच शेल्टर कार्यरत असल्याने श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पालिकेच्या रुग्णालयांत दर महिन्याला दीड हजारहून अधिक रुग्ण हे केवळ कुत्र्याच्या चाव्यामुळे आले असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी २०१६ पासून मे २०१६ पर्यंत ८४९० जणांना शहरातील विविध भागांत श्वानदंश झाला असल्याचे यामधून स्पष्ट होते. दोन वर्षांपूर्वी पालिकेत झालेल्या ठरावानुसार ४ ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर करण्यात येणार होते. मात्र, दोन वर्षे होऊनही अद्याप केवळ दोनच ठिकाणी हे शेल्टर सुरू झाले आहेत. यामध्ये केशवनगर येथील मुंढवा येथे व नायडू रुग्णालयाच्या आवारातील शेल्टर कार्यरत झाले आहेत. यामध्ये अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल रुल २००१ या कायद्यानुसार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. तसेच त्यांचे लसीकरणही करण्यात येते, अशी माहिती महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘या दोन्ही ठिकाणी मिळून सध्या दिवसाला ५० ते ६० कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी केली जात आहे. सध्या या कामासाठी पालिकेकडे दोन्ही मिळून ८ एकर जागा उपलब्ध असून, वर्षाला ६० लाख इतका निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेतर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. बालेवाडी येथे तिसरा प्रकल्पाचे काम चालू असून, येत्या वर्षभरात तो पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक प्रभारी उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.डॉ. साबणे म्हणाल्या, की सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे काम पालिका प्रशासनाबरोबरच ४ स्वयंसेवी संस्थांना देण्यात आले आहे. शेल्टरच्या प्रकल्पासाठी आणखी मोकळ्या जागेचा शोध चालू असून, ती मिळाल्यास हे काम आणखी वेगाने चालू होईल. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये रेबिजविरोधी लस उपलब्ध करण्यात आली असून, या लसीचा अतिरिक्त साठाही पालिकेने उपलब्ध केला आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिज आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची या वर्षातील संख्या १५ आहे. रेबिजच्या रुग्णांचे उपचार पुण्यातील नायडू रुग्णालयात होतात.