शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे पाळताय, मग नियमही पाळा !

By admin | Updated: July 4, 2016 02:27 IST

रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे.

मुंबई : रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच मुंबईकर प्रवास करतात. पण या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींना आता त्यांच्या संगोपनाचे नियम पाळावे लागणार आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने भटक्या कुत्र्यांच्या पालनाची नियमावली तयार केली असून, श्वानप्रेमींना ती पाळणे बंधनकारक असणार आहे.भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आहे. रात्री-अपरात्री घरी परतताना कुत्र्यांना घाबरून सारे प्रवास करतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांनी हल्ले केले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला असून आता भटक्या कुत्र्यांना सांभाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील, असे म्हटले आहे. यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची काळजी श्वानप्रेमींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करणे, आरोग्य तपासणी करणेही श्वानप्रेमींना बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही वेल्फेअरने केली आहे. (प्रतिनिधी)भटके कुत्रे असोत वा पाळीव, नियमांचे पालन केलेचे पाहिजे. श्वानप्रेमींनी तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कुत्र्यांना खायला घातले की जबाबदारी संपत नाही, तर त्यांची काळजी आपणच घ्यायला हवी. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास ५० कुत्र्यांवर खाण्याचा खर्च करण्यापेक्षा फक्त १० कुत्र्यांच्या संगोपनाचा सगळा खर्च उचला. त्यामुळे कुत्र्यांपासून होणारे आजारही कमी होतील.- सुनीश कुंजू, सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी>हे नियम पाळाचभटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना त्यांच्या आरोग्य तपासणी आणि नसबंदीची जबाबदारी घ्यावी लागेल.इमारत परिसर, चाळीमध्ये भटक्या कुत्र्यांना आसरा देऊ नका. खेळाची मैदाने आणि लहान मुलांपासून कुत्र्यांना दूरच ठेवा.सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका.कुत्र्यांना ज्या ठिकाणी खायला घालाल, तेथील शिल्लक उष्टे उचलून टाकणे, खाद्यपदार्थ घालणाऱ्याची जबाबदारी असेल.कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.