शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खाण्यावर बंदी घातल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते का? - हायकोर्ट

By admin | Updated: December 13, 2015 03:04 IST

गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने खाण्यावर बंदी टाकल्याने मूलभूत अधिकारांचे

मुंबई : गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने खाण्यावर बंदी टाकल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते का? अशी विचारणा या याचिकांमध्ये मध्यस्थी करणाऱ्यांना केली.भविष्यात जर राज्य सरकारने मांसाहार खाण्यावर बंदी घातली, तर नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार आहे का? किंवा राज्य सरकारने आणखी काही खाण्याच्या वस्तूंवर बंदी घातली, तर लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार आहे का? असे प्रश्न न्या. अभय ओक व न्या. शिरीष गुप्ते यांनी मध्यस्थींच्या वकिलांना विचारले.राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना, राज्य सरकारने जर नागरिकांनी ठरावीकच प्रमाणात पाणी प्यायचे असा कायदा आणला, तर कोणत्या अधिकाराचे उल्लंघन होते? असे खंडपीठाने सहजच मध्यस्थींच्या वकिलांना विचारले. मध्यस्थी याचिका करून, राज्य सरकारच्या बैल मांसबंदीचे समर्थन करणाऱ्या, आत्मकमल लब्दी ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. अंतुरकर यांनी, ही बंदी जनहितार्थ असल्याचे म्हटले.राज्य सरकार केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर राज्याच्या बाहेरील गायीही वाचवत आहे. त्या वाचवण्यासाठी सरकारने कायदा तयार केला, तर त्यात गैर काय? असा युक्तिवाद अ‍ॅड. अंतुरकर यांनी केला, तर युनियम मुस्लीम लीगच्या वतीने ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी या बंदीमुळे मुस्लीम समाज आणि खाटिकाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे खंडपीठाला सांगितले.बैलांचा बळी देणे, ही प्रथा धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, असे आम्हाला दाखवून द्या, असे खंडपीठाने म्हणत, या याचिकांवरील पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण (सुधारित) कायद्यांतर्गत बैलांची कत्तल करणे, मांस खाणे, मांस बाळगणे, विक्री करणे, आयात करण्यावर बंदी घातली आहे, तसेच शिक्षेची तरतूदही केली आहे.