शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोर ‘चेकमेट’!

By admin | Updated: July 2, 2016 05:24 IST

वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत करण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले.

ठाणे : वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत करण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले. या दरोड्यातील १६ जणांपैकी सहा जणांना जेरबंद करण्यात आले असून, त्यात कंपनीतील आजी-माजी कर्मचारीही आहेत. त्यांच्याकडील नऊ कोटींपैकी सव्वाचार कोटी रुपये आणि तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. नीतेश भगवान आव्हाड उर्फ गोलू (२२), मयूर राजेंद्र कदम उर्फ अजिंक्य (२१), अमोल अरुण कर्ले (२६), आकाश चंद्रकांत चव्हाण उर्फ चिंग्या (चौघेही ठाण्याचे) आणि उमेश सुरेश वाघ (२८) तसेच हरिश्चंद्र उत्तम मते (३०) (दोघे नाशिकचे) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. अन्य आरोपी नाशिकच्या वाडीवऱ्हे, घोटी, सातपूर भागातील आहेत. त्यांना पकडण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांत आणि परराज्यांतही पथके रवाना करण्यात आली असून, त्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. वागळे इस्टेट येथील हिरादीप बिल्डिंगच्या तळघरात असलेल्या चेकमेट कंपनीत २८ जूनला मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास हा दरोडा पडला होता. (प्रतिनिधी)।दोन महिन्यांपूर्वीच रचला होता कट अमोल या कंपनीत कार्यरत होता, तर आकाश हा माजी कर्मचारी होता. हवी असलेली शिफ्ट मिळत नसल्याचे कारण सांगत त्याने तीन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती.त्यानंतर अमोलने तेथे आकाशला कामाला लावले होते. त्यामुळे आकाशने अमोल व उमेशच्या मदतीने योजना आखून हा दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले.हा दरोडा टाकण्यापूर्वीही त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला होता. मात्र, तो फसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. ।महासंचालकांकडून कौतुकआधी दोन हजार कोटींचे इफेड्रिन ड्रग रॅकेट प्रकरण आणि आता दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत पोहोचून ते तातडीने उघडकीस आणणाऱ्या ठाणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी महासंचालक प्रवीण दीक्षित मुद्दाम ठाण्यात आले होते.