शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये पाठविणार डॉक्टरांची चमू

By admin | Updated: September 14, 2014 01:05 IST

पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या ६० वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुराने १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत.

आयएमएचा पुढाकार : औषधे आणि निधीही देणारनागपूर : पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या ६० वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुराने १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. जम्मूसह अन्य भागांत तात्पुरती रु ग्णालये उभारण्यात येत आहेत, यात इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारावर आवश्यक औषधांसोबतच, डॉक्टरांची चमू आणि आर्थिक मदतीही केली जाणार आहे.काश्मिरातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नेहमीप्रमाणे संकटकाळी धावून येणाऱ्या आयाएमएनेही यात तत्परता दाखविली आहे. आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आयएमएच्या दिल्ली येथील मुख्यालयाने आपल्या सर्व शाखांना जम्मू-काश्मीरमध्ये मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यात साथरोगांवरील औषधे, अ‍ॅण्टीबायटीक, ताप, खोकला यावरील औषधे गोळा करून संबंधित शाखेकडे जमा करण्याचा सूचना केल्या आहेत. सोबतच या राज्यात आपली सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांची नावे पाठविण्याची व ‘आयएमए आपत्ती व्यवस्थापन फंड’ मध्ये मदत करण्याचे आवाहनही केले आहे. त्यानुसार नागपूर शाखा कामाला लागली आहे. शहरात आयएमएचे तीन हजार सदस्य आहेत. या सर्वांना शनिवारी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत सेवा देणाऱ्या डॉक्टरांची यादी व औषधे मुख्य कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार वेगाने कामे सुरू झाली आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)